mumbai crime For second marriage he killed his child police esakal
मुंबई

Mumbai Crime : दुसऱ्या लग्नासाठी त्याने पोटच्या मुलाला संपवले

दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पोटच्या मुलाची हत्या करुन, खाडीत फेकणाऱ्या निर्दयी बापाला माहिम पोलिसांनी बुधवारी अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पोटच्या मुलाची हत्या करुन, खाडीत फेकणाऱ्या निर्दयी बापाला माहिम पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिस चौकशीत २२ वर्षीय आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्यासाठीचा मार्ग मोकळा करण्यासाठी२ वर्षाच्या मुलाला संपवल्याची कबूली दिली. आरोपीवर खून (३०२) अपहरण (३६२) आणि इतर आयपीसी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहू नगर पोलिसांना बुधवारी सकाळी माहिम-सायन खाडी लिंक रोड इथे एका लहान मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये होता, मृतकाचे डोके आणि उजवा हात उंदीराने कुडतडला असल्यामुळे मृतकाची ओळख पचवणे कठिण होते. दुसरीकडे मृतक मुलाचे नातेवाईकांनी या मुलाला शोधत होते.

त्यांनी बुधवारी सकाळी हा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही शाहू नगर पोलिसात नोंदवली होती.नातेवाईकांशी संपर्क केल्यावर मृतदेहाला ओळख पटवली गेली.त्यानंतर पोलिसांच्या चौकशीचे चक्र सुरु झाले. मृतकाचे वडील धारावी झोपडपट्टीत राहत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अटक केली.

दुसऱ्या लग्नासाठी मुलाला संपवले

पोलिस चौकशीत आरोपीने माझे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबध आहे. मला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र त्याअगोदर तूझ्या मुलाला आणि पत्नीला संपव अशी सदर महिलेने ठेवली होती. त्यामुळे पहिले मुलाला संपवण्याचा कट आरोपीने रचला.

चॉकलेट घेवून देतो अस म्हणून मुलाला आईपासून दूर नेले. त्यानंतर त्याचा गळा आवळून ठार केला, पुरावे मिटवण्यासाठी त्याला माहीमच्या खाडीत फेकल्याची कबूली आरोपीनी दिली.आरोपी धारावीमध्ये कपड्याच्या कारखान्यात टेलर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT