Mumbai Crime Fraud by pretending representative of Paytm company Accused in custody police esakal
मुंबई

Mumbai Crime News : पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी बनून फसवणुकीचा प्रकार; आरोपी अटकेत

पेटीएम कंपनीचा कर्मचारी सांगून व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर ए के मार्ग पोलिसांनी अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पेटीएम कंपनीचा कर्मचारी सांगून व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर ए के मार्ग पोलिसांनी अटक केली आहे . 27 वर्षीय आरोपीचे प्रमोद झा असे नाव आहे. या प्रकरणात फळ विक्रेते मोहम्मद रायनी यांची पेटीएम कंपनीचा बनावट कर्मचारी बनून फसवणूक केली होती.

आरोपीने जुलै 2022 मध्ये पिडीत व्यक्तीच्या शिवडीतील फळाच्या ठेल्यावर येऊन पेटीएम कंपनीकडून आल्याचे सांगितलें. आरोपीने पेटीएममध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने चालू खाते बंद करून नवीन खाते उघडण्यास व्यापाऱ्याला सांगितले.

बनावट कर्मचाऱ्याच्या बोलण्यात फसून पिडीत व्यक्तीने आपले पेटीएम खाते बंद केल. परंतु जानेवारी 2023 मध्ये पेटीएम पोस्टपेड कंपनीकडून पैसे भरण्याकरिता वारंवार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पिडीत व्यक्तीला फोन येत होते. तेव्हा त्यांना जून जुलै महिन्यात जो इसम पेटीएम कंपनीकडून आला होता त्यानेच हे केल्याचे दाट संशय आला. त्या अनोळखी व्यक्तींविरोधात 3 फेब्रुवारीला आर ए के मार्ग पोलिसात पिडीतांनी गुन्ह्याची नोंद केली.

पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी च्या मोबाईलवर लिंक असलेले पेटीएम खात्याबद्दल माहिती प्राप्त करण्या करिता कंपनीशी पत्रव्यवहार करून माहिती प्राप्त केली. माहितीचे अवलोकन केले असता फिर्यादीच्या पेटीएम खात्यास दुसरा मोबाईल क्रमांक लिंक असल्याचे दिसून आले.

त्या मोबाईल क्रमांकाचे तात्काळ माहिती प्राप्त करून पाहिजे आरोपीचे नाव, पत्ता व पर्यायी मोबाईल क्रमांक इतर माहिती पोलिसांना मिळाली .प्राप्त माहितीवरून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन पोलिसाना मिळाले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी विपुल प्रमोद झा यास मोतीलाल नेहरू नगर, अँटोप हिल परिसरातून ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

Latest Live Updates Marathi: लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT