Mumbai Crime file photo
मुंबई

Mumbai Fraud : गुप्तहेर संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगून करोडोची फसवणूक; तोतया अधिकारी अटकेत

आरोपीने सांताक्रूझ येथील एका व्यावसायिकाची सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुप्तहेर संस्थेचा गुप्तहेर म्हणुन भासवूनआर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईताला अटक केली आहे. आदित्य अशोक जोगानी उर्फ अजय दवे असे 44 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मलबार हिलचा रहिवासी आहे.

आरोपीने सांताक्रूझ येथील एका व्यावसायिकाची सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने केंद्रीय गुप्तचर संस्थेचा गुप्तहेर एजंट म्हणून ओळख सांगून दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा करून व्यावसायिकाची फसवणूक केली.

2018 ते 2022 या दरम्यान आरोपीदवेने तक्रारदार व्यावसायिकाकडून त्याच्या कथित राजकीय प्रभावाचा वापर निविदा मंजूर करणे, महाविद्यालय किंवा शाळेत प्रवेश देणे इत्यादी कामे करून देण्याचे आश्वासन दिले. या बदल्यात आरोपीने फसवणूक करून व्यावसायिकाकडून पैसे घेतले.

परंतु व्यावसायिकाचे कोणतेही काम कधीच पूर्ण झाले नाही तसेच आरोपीने घेतलेले पैसे देखील परत केले नाहीत. अनेक महिन्यांपासून दवेकडे पाठपुरावा करून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तक्रारदाराने शेवटी पोलिसांशी संपर्क साधला.

सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पथकाने बुधवारी आरोपी अजय दवेला बीकेसी येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT