one business man fraud with kolhapur urban bank rupees one and half crore Sakal
मुंबई

Mumbai Crime : कविश्वास संपादन केला अन् ज्येष्ठाची 77 लाखाला फसवणूक...

त्यांना वाढीव व्याजाचे आमिष त्यांनी दाखविले. दर आठवड्याला व्याज मिळेल असेही सांगितले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची कल्याण मधील दांम्पत्याने वाढीव व्याजाचे आमिष दाखवून 77 लाख 73 हजाराला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शांताराम निलख असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दाखल तक्रारीनुसार पूजा भोईर (वय 33) आणि विशांत भोईर (वय 35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसरात शांताराम हे राहण्यास आहेत. ते सेवानिवृत्त आहे. कल्याण मधील खडकपाडा परिसरात राहणारे पूजा आणि विशाल या पती पत्नीने शांताराम यांचा विश्वास संपादन केला.

त्यांना वाढीव व्याजाचे आमिष त्यांनी दाखविले. दर आठवड्याला व्याज मिळेल असेही सांगितले. यातून शांताराम यांनी 77 लाख 73 हजार रुपये भोईर दाम्पत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती दिले. दर आठवड्याला मोठी रक्कम हातात पडणार असल्याने शांताराम यांनी गुंतवणूक केली.

मात्र त्यांच्या हाती पैसे पडले नाही. गुंतवलेली रक्कम देण्यात भोईर हे टाळाटाळ करु लागले. सतत तगादा लावूनही भोईर दाम्पत्य वाढीव व्याज नाहीच पण मूळ रक्कमही परत करत नसल्याने आपली फसवणूक त्यांनी केली असल्याची खात्री शांताराम यांची झाली. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : चामोर्शी-मूल, आष्टी, घोट मार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी

मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', कारण काय?

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT