Crime
Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : सरकारी अधिकारी सांगत लग्नाचे आमिष... नंतर आर्थिक फसवणूक.. आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

आयकर विभागाचा अधिकारी सांगत विवाहाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या तोतयाला गावदेवी पोलीसानी सुलतानपूर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

मुंबई - आयकर विभागाचा अधिकारी सांगत विवाहाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या तोतयाला गावदेवी पोलीसानी सुलतानपूर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.राजेशकुमार गयाप्रसाद उपाध्याय, असून तो सुलतानपुर, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

ऑनलाईन ॲपच्या सहाय्याने आरोपी महिलांशी मैत्री करत असे. या प्रकरणात पिडीत महिलेशी ऑगस्ट 2021 पासून ते जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अ‍ॅपव्दारे आरोपिशी ओळख झाली. पीडितेला आरोपीने इनकम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून विवाहाचे आश्वासन देत विश्वास संपादन केला.

एकेदिवशी एका एनजीओ करीता पैशाची गरज आहे असे सांगून फिर्यादीचे आधारकार्ड, पॅनकार्ड, चालक परवाना व याचा वापर करून पिडीत महिलेच्या अपरोक्ष तिच्या नावे कर्ज घेतले. तसेच पिडीत महिलेला आरोपीने कर्जाचे पैसे बँकेच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. पिडीत महिलेला काही दिवसांनी पैशाची मागणी केली तेव्हा त्याने तिचे अर्धनग्न फोटो पाठवून ब्लॅकमेल केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतच महिलेने गावदेवी पोलिसात गुन्हा नोंदवला.

गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला असता गुन्हयातील संशयीत आरोपी हा सुलतानपुर, लखनऊ या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे समजले. गांवदेवी पोलीस ठाणेचे पोलीस पथक सुलतानपुर येथे रवाना झाले. पोलीस पथकाने आरोपीस अटक करून ताब्यात घेतले. आरोपीस मुंबईतील दंडाधिकारी न्यायालय न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याला 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमाड मंजुर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT