crime news 
मुंबई

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीचा अश्लील Video बनवून नातेवाईकांना पाठवला; तरूणाविरोधात गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत नातेवाईकाला पाठवणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुर्ल्यातील असून याप्रकरणी कुर्ला येथील विनोबा भावे मार्ग पोलिसांनी 18 वर्षीय तरूणाविरोधात सोमवारी विनयभंग, बदनामीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियाद्वारे पीडित मुलगी अल्पवयीन तरुणाच्या संपर्कात आले. काही काळाने आरोपी तरुण आणि मुलगी यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्याचाच फायदा उचलत तरूणाने अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रीकरण केले. पीडित मुलीशी काही वाद झाल्यानंतर आरोपी तरुणाने तिच्या नातेवाईकाला ते व्हिडीओ पाठवले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲपद्वारे पीडित मुलीशी संपर्क साधून प्रेम करत असल्याचे भासवले. त्यानंतर स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन तिचे चित्रीकरण केले. तसेच छायाचित्रही काढले.

त्याद्वारे आरोपी पीडित मुलीकडे शारिरीक संबंधांची मागणी करत होता. त्याला नकार दिला असता आरोपीने पीडित मुलीची चित्रफित नातेवाईक मुलीला पाठवून तिची बदनामी केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT