Mumbai Crime Breaking sakal
मुंबई

Mumbai Crime: जेसीबी चालकाने केली पत्नीची हत्या अन् सुसाईड नोट लिहित.., वाचा थक्क करणार प्रकरण

Mumbai Crime News: हत्या करून पळून आल्यावर तो पनवेल परिसरात जेसीबीवर चालक म्हणून काम करत होता

Chinmay Jagtap

Navi Mumbai Crime: पत्नीची हत्या करून प्रेयसीसोबत पळून आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिस आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली.

सूरज लहू तोरकड (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. हत्या करून पळून आल्यावर तो पनवेल परिसरात जेसीबीवर चालक म्हणून काम करत होता.(Navi Mumbai Crime News)

सूरज तोरकड हा मूळचा धाराशिव जिह्यातील भूम येथील असून त्याच्या मृत पत्नीचे नाव पूर्णिमा मनोहर पासलकर (वय १८) असे होते. सूरजचे एका अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले होते. त्यामुळे पत्नीसोबत त्याचा वाद झाला होता. त्यानंतर सूरजने पूर्णिमा हिचा गळा दाबून तिची हत्या केली.

तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळून टाकला. मृत महिला ही त्याची अल्पवयीन प्रेयसी असल्याचे भासवण्यासाठी त्याने सुसाईड नोट मृतदेहाजवळ ठेवली. भूम पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी पनवेल परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून सापळा रचला. सूरज हा पनवेलमधील चिपळे येथे राहत असल्याचे पोलिसांना कळले होते. सूरज एका महिलेसोबत दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसला. पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.(navi mumbai News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : लातूरच्या खाजगी शाळांमध्ये पालकांची लूट

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT