mumbai crime gun  sakal
मुंबई

Mumbai Crime : उत्तर प्रदेशहून आणालेल्या कट्ट्याची करत होता विक्री; पोलिसांनी...

सकाळ डिजिटल टीम

Kalyan : उत्तर प्रेदशमधून आणलेला गावठी कट्टा कल्याणमध्ये विक्री करताना एकाला कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केल्याची घटना शनिवारी (ता. ४) घडली. दानिश इश्तियाक अन्सारी (वय ३१, रा. भिवंडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर पगारे व त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार सुशील हांडे, विकास भामरे, सुरेश जाधव, सचिन कदम, पोलिस नाईक रोहिदास बुधवंत, गोरक्षनाथ घुगे हे शनिवारी रात्री आनंदवाडी भागात गस्त घालत होते.

पोलिस डबल टॉवरजवळ आले असता त्यांना दानिश अन्सारी संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. त्याने उत्तर प्रदेश येथून गावठी बनावटीचा कट्टा आणलेला असून विक्रीसाठी तो कल्याण येथे ग्राहक शोधत असल्याची माहिती उघड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT