मुंबई

फटका गॅंगवर ड्रोनची नजर! दहशत रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना सुरु

कुलदीप घायवट

मुंबई  : हार्बर मार्गावर वडाळा, गोवंडी, मानखुर्द या भागात फटका गॅंगच्या सर्वाधिक घटना होतात. फटका गँगची दहशत रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर जेथे सर्वाधिक घटना घडून येत आहेत, तिथे सुरक्षा जवान तैनात केले जात आहेत. तर, फटका गॅंगच्या हालचाली टिपण्यासाठी, त्यांचा चेहरा हेरण्यासाठी ड्रोनचा वापर मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बलाकडून केला जाणार आहे.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरू झाली आहे. तेव्हापासून फटका गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्याच्या हातावर फटका मारून मोबाईल, बॅग, मौल्यवान वस्तू चोरून नेत आहेत. फटका गॅंग अंधार, झाडेझुडपे आणि गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना करत आहेत. एक्सप्रेस, लोकलच्या दरवाज्यावर मोबाईल, मौल्यवान वस्तू हाताळत असलेल्या प्रवाशाच्या हातावर लाकडी किंवा धातूच्या वस्तूने जोरदार प्रहार करतात. त्यांच्याकडून रेल्वे रुळावर पडलेली सामग्री घेऊन पळ काढतात. मागील आठवड्यात कॉटनग्रीन- शिवडी दरम्यान आणि एलटीटी-चेंबूर दरम्यान फटका गँगच्या प्रत्येकी एक घटना घडली आहे. 2020 वर्षात रेल्वे मार्गावर 20 घटना फटका गँगच्या झाल्या असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

फटका गॅंगला रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्यावतीने भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. हार्बर मार्गावरील एकूण नऊ ठिकाणी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे गस्ती घालण्यात येणार आहे. फटका गॅंगच्या हालचालीला हेरण्याची ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. वडाळा, गोवंडी, मानखुर्द येथे सुमारे 50 सुरक्षा जवानांची अचानक गस्ती घालण्याची योजना केली आहे. 
- जितेंद्र श्रीवास्तव,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे   

----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai crime marathi Drones eye fataka gang Security measures taken latest updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT