Crime News 
मुंबई

Mumbai : मुंबईत मागील चार महिन्यात 1977 महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंदणी; तरी...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या 4 महिन्यात महिला अत्याचाराच्या प्रतिदिन 16 गुन्ह्यांची नोंद होत असल्याची माहिती मिळत आहे. चार महिन्यात मुंबईत महिला अत्याचाराचे एकूण 1977 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणांमध्ये 1470 प्रकरणांची उकल करण्यात पोलिसाना यश आले. अशाप्रकारे 74% प्रकरणाची उकल करण्यात आल्याचे आकडेवारी सांगत आहे. तसेच अजून समाधानकारक बाब म्हणजे महिला विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 5% घटली असल्याचे मुंबई पोलिसांची आकडेवारी सांगते.

1977 गुन्ह्याची नोंद

यावर्षी जानेवारी ते एप्रिल या पहिल्या चार महिन्यात मुंबईतील 93 पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण 1977 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये 1470 प्रकरणं सोडवली असल्याचा दावा पोलिसांच्या आकडेवारीत करण्यात आला आहेत.

यात सर्वाधिक मार्च एप्रिल या दोन महिन्यांमध्ये प्रत्येकी 506 गुन्ह्याची नोंद झाली. तर सर्वात कमी फेब्रुवारी महिन्यात 453 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे मुंबई पोलीस महिला अत्याचाराच्या प्रतिदिन 16 गुन्ह्यांची नोंद करत असल्याची माहिती आहे.

महिना एकूण गुन्हे गुन्ह्याची उकल उकल

जानेवारी 502 327 65%

फेब्रुवारी 453 284 71%

मार्च 506 321 74%

एप्रिल 506 304 74%

एकूण 1977 1470 74%

सद्य परिस्थिती

अहवालानुसार, जानेवारी ते एप्रिलपर्यंत मुंबई पोलिसांनी बलात्काराचे 325, अपहरणाचे 407 विनय भांगाचे 714 आणि हुंडाबळीचे 228 गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी 286 गुन्हे बलात्काराचे आणि 332 अपहरणाचे गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आले.

तर हुंड्यासाठी छळाची फक्त 86 प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूण या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यात महिला अत्याचाराच्या 74% गुन्ह्यांची उकल मुंबई पोलिसांनी केली आहे.गेल्या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत हा आकडा 65 टक्के होता.

गुन्हे. जानेवारी ते एप्रिल 23 गुन्ह्यांची उकल सक्सेस रेट

बलात्कार. 325 286. 88%

अपहरण. 407 332 82%

विनयभंग 714 572 80%

हुंडाबळी 228 86 39%

325 बलात्काराची नोंद

मुंबई पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या अहवालानुसार यावर्षी जानेवारी ते एप्रिल पर्यंत 325 बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली. सुखदायी बाब म्हणजे मुंबई पोलिसाना 88% 285 आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाले आहे .यामध्ये जानेवारीमध्ये 78, फेब्रुवारीमध्ये 60, मार्चमध्ये 90 आणि एप्रिलमध्ये 89 बलात्कारांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

महिना बलात्कार गुन्हे उघडकीस

जानेवारी 78 59

फेब्रुवारी 60 43

मार्च 90 72

एप्रिल. 78 61

एकूण. 325 285

5% गुन्ह्यात घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 5 टक्के घट झाल्याची पाहिला मिळते. जिथे गेल्या वर्षी 2022 सालच्या जानेवारी ते एप्रिल या काळात महिलांवरील अत्याचाराच्या 2078 गुन्ह्यांपैकी फक्त 1341 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

तर यावर्षी पहिल्या चार महिन्यात महिला अत्याचाराचे 1977 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये 1470 गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.

गुन्हे जानेवारी ते एप्रिल 22 गुन्ह्यांची उकल सक्सेस रेट

बलात्कार 304 247 81%

अपहरण 357 259 73%

हुंडाबळी 295 72 24%

पोलिसांच्या उपाययोजना

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी 60 दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एकाकी महिला असतील तर त्यांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक, निर्भया पेटी आणि महिला सुरक्षेसंबंधी इतर महत्त्वाच्या सूचना जारी केल्या.

दरम्यान, महिलांची सुरक्षा आणि व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळेच कदाचित वर्षी महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाहीतर यामुळे तपासाचं प्रमाणही वाढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT