मुंबई

अंधेरीत सुरक्षा रक्षकाकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अनिश पाटील

मुंबई  - अंधेरीतील अंबोलीच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अंबोली पोलिसांनी अटक केली. ज्ञानबा रघुनाथ भानगे (वय 50) असे या आरोपीचे नाव आहे. 

नालासोपारा परिसरातील ज्ञानबा हा अंधेरीतील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. 25 जानेवारीला सायंकाळी दोन मुली इमारतीच्या परिसरात खेळत होत्या. त्यातील एकीचे वय 11, तर दुसरीचे वय 12 आहे. या मुली खेळत असताना आरोपी ज्ञानबाने त्यांना पाहिले. त्यानंतर त्यांना जवळ बोलावून ज्ञानबा त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी त्याने मुलींना दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींच्या वागण्यात बदल झाला होता.

कुटुंबीयांना तो जाणल्यानंतर पालकांनी मुलींना विश्‍वासात घेऊन चौकशी केली. त्या वेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ज्ञानबावर अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

mumbai crime news abuse of minor girls by security guards in andheri 

--------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT