Crime  sakal
मुंबई

Mumbai Crime News : चहाचे पैसे देण्यास मित्राने नकार देताच केला चाकूनं वार

मित्रावरच चाकूने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - रस्त्याने चालत जात असतानाच गुंड टेडीने आपल्याच मित्राला चहाचे पैसे देण्याची मागणी केली. त्यावेळी मित्रानं कामावर जाण्यास उशीर होत असून माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा संतापलेल्या टेडीने भर रस्त्यात मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना कल्याण मध्ये घडली आहे.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय अनिल मखवाना उर्फ टेडी (वय 22) असे हल्लेखोराचे नाव आहे. तर विशाल प्रभाकर पाटोळे (वय 22) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साथीदाराचे नाव आहे.

तक्रारदार विशाल हा कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरातील आत्माराम नगरमध्ये कुटुंबासह राहतो. तर हल्लेखोर टेडी हा कल्याण पूर्वेतील आनंदवाडी येथे राहत असून तो कल्याण पूर्वेत गावगुंड म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, तक्रारदार विशाल आणि हल्लेखोर टेडी या दोघांनी यापूर्वी चोरीचे गुन्हे सोबत केल्याने त्यांची आधीपासूनच ओळख असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

विशाल हा रविवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी तो कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून पायी जात असतानाच हल्लेखोर टेडीने विशालकडे चहा पिण्यासाठी पैश्याची मागणी केली मात्र विशाल म्हणाला की, माझ्याकडे पैसे नसल्याने मी देऊ शकत नाही. आधीच मला कामावर जाण्यास उशीर झाल्याने पैश्याची मागणी करणाऱ्या हल्लेखोराला बोलताच त्याने विशालला शिवीगाळ करत मारहाण करण्यात सुरुवात केली.

त्यामुळे विशालही त्याला मारहाण करत असल्याचे पाहून हल्लेखोर टेडीने अचानक खिश्यातून धारदार चाकू काढून विशालवर भर रस्त्यातच सपासप वार करून घटनास्थळावरून पळून गेला. विशाल गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी जखमी विशालचा जबाब घेऊन त्याच्या तक्रारीवरून हल्लेखोर संजय उर्फ टेडी याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. घटनेपासून हल्लेखोर संजय उर्फ टेडी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''जर इराणने माझी हत्या केली तर...'' डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितला पुढचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

SCROLL FOR NEXT