मुंबई

Mumbai Crime: दारुच्या नशेत 'त्याने' तिची केली हत्या; प्रेताचीही लावली विल्हवाट

January 23, Shivdi police found the body of an unidentified woman शिवडीतील टिकटॉक पॉइंट, बीपीसीएल कंपनीच्या मागील बाजूस शिवडी पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता.

Chinmay Jagtap

मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून शिवीगाळ केली म्हणून शिवडी परिसरात एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी शहजादा ऊर्फ रमजान शफी शेख या आरोपीला नाव अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

आरोपीने सपना सतीश बातम या 40 वर्षांच्या मैत्रिणीची दगडाने ठेचून हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करून पळून गेला होता. शिवडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

23 जानेवारीला शिवडीतील टिकटॉक पॉइंट, बीपीसीएल कंपनीच्या मागील बाजूस शिवडी पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता.

हा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या स्थितीत होता, त्यामुळे या महिलेची ओळख पटली नव्हती. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्यात जड वस्तूने मारहाण करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. हत्येनंतर मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शिवडी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने महिलेची ओळख पटावी म्हणून विविध परिसरात एक हजाराहून अधिक फोटो लावले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

या माहितीनंतर ही महिला मुंबई सेंट्रल येथे वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिचा फोटो तिच्या मुलीला दाखविला असता, तिने तिचे नाव सपना बातम असल्याचे असल्याचे सांगितले.

14 जानेवारीला सपना ही रमजानसोबत बाहेर गेली होती. हाच धागा पकडून पोलिसांनी पोलिसांनी रमजानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी अंती आरोपी रमजानला शिवडी पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

SCROLL FOR NEXT