Mumbai Crime News 
मुंबई

Mumbai Crime News: धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागितल्याने हत्या; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

खर्डी: शहापूर तालुक्यातील शिवनेर गावाजवळ शेतात एक अनोळखी मृतदेह ११ जून रोजी आढळला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे; तर एक आरोपी फरारी आहे. मित्राने उसने दिलेले १६ लाख रुपये मागितल्यामुळे आरोपींनी हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

कल्याण (चक्की नाका) येथील गोपाळ रंग्या नायडू (वय ६२) हे बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने पथके बनवून तपास सुरू केला होता.

मृतदेहाची ओळख पटवून घेतली व गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन तांत्रिक तपास सुरू केला. अरुण जगन्नाथ फर्डे (वय ३२, रा. धसई, फर्डेची) व सोमनाथ रामदास जाधव (वय ३५, कल्याण, खडकपाडा) यांना सापळा रचून ताब्यात घेतले.

या दोघांकडे तपास केले असता फरार आरोपीने मृत गोपाळ नायडू यांच्याकडून १६ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे गोपाळ वारंवार फरार आरोपीकडे मागत होता. त्यामुळे गोपाळचा राग मनात ठेवून तिघांनी मिळून गोपाळची हत्या केली असल्याची कबुली अरुण व सोमनाथ यांनी दिली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT