मुंबई

नामांकित IT कंपनीचा कर्मचारी डार्क वेबवरून करायचा काळे धंदे, NCB ने ड्रग्ससकट अरबाजलाही उचललं

सुमित बागुल

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून NCB म्हणजेच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून धडक कारवाया केल्या जातायत. अशीच आणखीन एक मोठी आणि धडक कारवाई NCB मार्फत मुंबईत करण्यात आली.

NCB च्या कारवाईअंतर्गत मुंबईतील सर्वात मोठं LSD या अमली पदार्थाचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात नार्कोटिक कंट्रोल ब्युरोला यश आलं आहे. NCB मार्फत 27 तारखेपासून नवीन मोहीम राबवली जातेय. या अंतर्गत NCB ने ही कारवाई केली आहे. NCB  ने उध्वस्त केलेल्या रॅकेटकडून 336 ब्लॉट्स LSD ड्रग्स आणि तब्बल अर्धा किलो मारुआना जप्त करण्यात आलं आहे

कारवाईत तिघांना अटक

नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरबाझ शेख, सुरज सिंग अशी आहेत. यापैकी अरबाझ शेख हा नामांकित IT कंपनीमध्ये कामाला आहे. तर अरबाज हा सुरजकडून अमलीपदार्थ घेत होता. IT कंपनीत काम करण्यासोबत अरबाज हा डिस्क जॉकी म्हणजेच DJ देखील आहे. इंटरनेटवरील डार्क वेब च्या माध्यमातून परदेशातून ड्रग्सची विक्री केली जायची. अरबाज हा पेडलरचं देखील काम करत असल्याची बाब समोर येतेय. अरबाजकडून तब्बल 336 ब्लॉट्स LSD, 430 ग्रॅम गांजा तर 6 ग्रॅम कोकेन असं ड्रग्सचं घबाड हस्तगत कातरण्यात आलं आहे.

या दोघांसोबत नवी मुंबईतील नेरूळमध्ये देखील NCB अधिकारी आणि पोलिसांनी देखील छापेमारी केली. तिथूनही गांजाच्या तस्करी अंतर्गत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यात.   

mumbai crime news narcotic control bureau busted biggest illegal herbs and powder racket 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT