mumbai crime  sakal
मुंबई

Mumbai Crime News: सराईत चोरट्यांना पोलिसांनी केली अटक, १ लाख किंमतीचे ८ मोबाईल हस्तगत!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime News: ठाणे लोहमार्ग पोलिसांनी सराईत मोबाईल चोरट्यांना साफळा रचून सोमवारी अटक केली आहे. त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी १ लाख ८ हजार ७८१ रुपयांच्या किंमतीचे ८ मोबाईल जप्त केले आहेत.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी आणि हरविण्यासंदर्भात अनेकदा तक्रारी येत असतात.

तसेच रेल्वे रुळावर नशा करणारे मुलं प्रवाशांना हाताने तसेच काठीने फटका मारुन रेल्वे प्रवाशांच्या जीवीतास तसेच मालमत्तेस हानी पोहचतात अशा स्वरुपाचे गुन्ह्यांचा तपास ठाणे लोहमार्ग पोलिसांचे गुन्हे प्रकटीरण पथक आणि मोबाईल फोन ट्रेसिंग पथक हे शोध घेवून गुन्हे उघड करीत असतात. १६ मे २०२४ रोजी एका गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचे ट्रेसिंग प्राप्त झाले होते.

त्यावरुन २० मे २०२४ रोजी गुप्त बातमीदारांच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांनी साफळा रचून सुरज रामचंद्र साबत, वय २० वर्षे, पप्पुकुमार परमेश्वर मुखीया मल्हा, वय १९ वर्षे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तसेच चोरट्यांकडे दोन बालके ही आढळून आलेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT