crime news mumbai  Sakal
मुंबई

Crime News: महिलेसह दोघांना देशी पिस्तूल आणि काडतुसांसह अटक, स्थानिक पोलिसांची कारवाई

विलेपार्ले आणि मालाड परिसरात काहीजण इतर राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती विलेपार्ले आणि मालवणी पोलिसांना मिळाली होती

सकाळ वृत्तसेवा

Andhari News: दोन विविध कारवायांमध्ये एका महिलेसह दोघांना घातक शस्त्रांसह मालाड आणि विलेपार्ले येथून स्थानिक पोलिसांनी अटक केली. पूजा संदीप लोंढे ऊर्फ नगमा हनीफ शेख आणि महेश रामलखन गुप्ता ऊर्फ मटरू अशी या दोघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेनंतर दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. विलेपार्ले आणि मालाड परिसरात काहीजण इतर राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती विलेपार्ले आणि मालवणी पोलिसांना मिळाली होती. (andheri news)

विशेष पथकाने विलेपार्लेतील न्या. छगला मार्ग, संभाजीनगर परिसरातून नगमा शेख या महिलेस अटक केली. तिच्याकडे पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. या पिस्तूलबाबत तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी महेश गुप्ता याला अटक केली.()

देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. महेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तीन दिवसांपूर्वी तो मालवणीतील राठोडी, गावदेवी मंदिराजवळ पिस्तूलच्या विक्रीसाठी आला होता, कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याच्या अंगझडतीत पोलिसांना पिस्तूल आणि दोन राऊंड सापडले. या दोघांविरुद्ध नंतर आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवली आणि अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT