मुंबई

थरकाप उडवणारी बातमी : पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीने विजयला मारली मिठी, विक्षिप्त प्रेमाची भीषण कहाणी

सुमित बागुल

मुंबई : फेब्रुवारी महिना सुरु आहे. जसजशी फेब्रुवारीची १४ तारीख जवळ येते, त्याआधी तरुणाई विविध 'डे'ज साजरे करत असते. यामध्ये चॉकलेट डे, किस डे, Hug डे असे विविध दिवस तरुणाई मोठ्या उत्साहानं साजरी करत असते. मात्र मुंबईतून याच प्रेमाच्या आठवड्यात एक भयंकर बातमी समोर आली आहे. एका प्रियकराने थेट आपल्या प्रेयसीला जिवंत जाळण्याची भीषण घटना मुंबईतील जोगेश्वरीमध्ये घडलीये. ही बातमी वाचल्यावर तुमच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.  

नक्की झालं काय ? 

जोगेश्वरीतील गांधींवर परिसरातील विजय खांबे नामक तरुणाचे आपल्या मेव्हण्याच्या लहान बहिणीशी प्रेम संबंध होते. तब्ब्ल अडीच वर्ष दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधनांनंतर विजयने मुलीच्या आई वडिलांना लग्नासाठी मागणी देखील घातली होती. मात्र मुलीच्या घरून या लग्नाला विरोध होता. या सगळ्या वादामुळे विजय चांगलाच दारू प्यायला लागला होता. विजयला घरातून सातत्याने होणारा विरोध आणि आणि त्याचं दारुचं व्यसन यामुळे त्या मुलीनेही विजयशी संबंध तोडण्याचं ठरवलं.  

आता मुलीनेही आपल्याला नकार दिल्याने विजय सातत्याने मुलीला त्रास द्यायचा. कायम लग्नासाठी विचारायचा आणि लग्नाचा हट्ट देखील धरायचा. या सगळ्याला कंटाळून पीडित मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी तब्बल एक आठवडा रुग्णालयात होती. रुग्णालयातून घरी आल्यानंतर घरी कुणी नाही पाहून विजय पीडितेला भेटायटला घरी गेला. विजय जेंव्हा तरुणीला भेटायला गेला तेंव्हाच त्याने स्वतःबरोबर पेट्रोलची बाटली देखील नेली होती. 

घरात गेल्यावर विजयने पीडित मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. पीडित मुलगी घराबाहेर पडण्यासाठी आरडाओरडा करत होती. मात्र विजय दरवाजात वाट अडवून उभा होता. 

शेवटी या पीडित तरुणीने विजयला पेटलेल्या अवस्थेत घट्ट मिठी मारली. पेटलेल्या अवस्थेतील तरुणीने विजयला घट्ट पकडून ठेवल्यामुळे विजय चांगलाच भाजला. पेटलेल्या अवस्थेत दोघे घराबाहेर आल्यानंतर बाहेर उपस्थितांनी आग विझवली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

विजय या आगीत ९० टक्के भाजला होता. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. सदर तरुणी रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान,  मुलीच्या कुटुंबीयांनी मुंबईतील मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

mumbai crime news vijay torched her ex girlfriend but girlfriend hugged vijay

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT