Karnataka man kills delivery boy for Unable to pay for secondhand iPhone hides body for 4 days
Karnataka man kills delivery boy for Unable to pay for secondhand iPhone hides body for 4 days  esakal
मुंबई

Mumbai Crime News : महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःचंच घर फोडलं; चोरीचा बनाव करत पोलिसांत गेली...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या कुरार पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या घरातील तब्बल साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरी केले. कोणताही पुरावा नसताना कुरार पोलिसांनी हाताच्या बोटांच्या ठशावरून आरोपीला अटक केली आहे.

पायल ज्योतीराम शेडगे (३१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून कुरार पोलीस तीच्या प्रियकराचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्वेकडील ओमकार एस आर ए सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात हा प्रकार घडला. तक्रारदार आपल्या पत्नीसोबत मे 2022 मध्ये गावी गेले होते.

गावावरून मुंबईत घरी परतल्यानंतर घराचा बाहेरचा दरवाजा उघडून आज प्रवेश केल्यास आतील दरवाजाला तुटलेलं कुलुप आढळून आलं. घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटातील 3.77 लाखाचे दागिने आणि 4.57 लाखाची रोकड गायब असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. मात्र या ठिकाणी आरोपीने कोणताही पुरावा सोडला नव्हता. शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज किंवा इतरही काही पुरावा नसल्यामुळे पोलिसांपुढे तपासासाठी मोठे आव्हान होते. ही चोरी घरातीलच कोणीतरी केली असावी असा दाट संशय पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी घरातील व्यक्तींचा तपास करण्यास सुरुवात केली असता पोलिसांना तक्रारदाराच्या पत्नीवर संशय आल्याने तिचा तपास सुरू केला.

घरातील सर्व व्यक्तींच्या हाताच्या बोटांचे ठसे पोलिसांनी अगोदरच घेतले होते. यानुसार तक्रारदार यांच्या पत्नीच्या हाताचे ठसे आणि कपाट आणि त्या ठिकाणी इतर वस्तूंवरील ठसे मिळते जुळते आढळून आल्याने पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात तिने आपला गुन्हा कबूल केला या कामी तिला तिचा प्रियकर मालवणी परिसरात राहतो ,त्याने मदत केली असल्याचे तपासात कबूल केले. हे दागिने आणि रोकड घेऊन ते दोघेही पळून जाणार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT