Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : लोखंडी ग्रील उचकटून चोरट्यानी गल्ल्यातील 8 लाखाची रोकड लंपास, वाईन शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक

पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 50 हजाराची रक्कम हस्तगत केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime - डोंबिवलीत डिलक्स वाईन शॉपचे शटर व आतील लोखंडी ग्रील उचकटून चोरट्यानी गल्ल्यातील 8 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत तिघांना अटक केली आहे.

सरुउददीन शेख (वय 32), जुबेर जलील अन्सारी (वय 26) आणि शहाबुददीन ताजउददीन शेख (वय 32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 50 हजाराची रक्कम हस्तगत केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पश्चिमेला राहणारे रविंद्र शेट्टी यांचे डोंबिवली मध्ये डीलक्स वाईन शॉप मार्ट आहे. रविवारी रात्री दुकान बंद केले असता चोरट्यानी रात्री 10.30 ते पहाटे 3 च्या दरम्यान दुकानाचे शटर कशाने तरी दोन ते तीन फुट वरती उचकटुन व आतील लोखंडी ग्रील उचकटुन दुकानात प्रवेश केला.

टीवनंतर दुकानातील 8 लाख रुवयांची रोकड चोरट्यानी लांपाड केली होती. शेट्टी यांच्या तक्रारी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, पोलीस हवालदार विशाल वाघ, भणगे, शिवाजी राठोड, नितीन सांगळे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

गुन्हयाचे घटनास्थळा वरील तसेच आरोपीत येण्या - जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे नमुद गुन्हयात एकुण 3 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे आरोपींची माहिती काढत त्यांना अटक केली.

आरोपी मुंब्रा व शिवडी परिसरात राहणारे असून सरउद्दीन याच्यावर एकूण 15, जुबेर याच्यावर 14 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवली चे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT