Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : इराणी चोर जंगलात धावला, चिखलात झोपला शेवटी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला हेरले आणि हाती बेड्या ठोकल्या

मीरा भाईंदर युनिट व कल्याण खडकपाडा पोलिसांची कारवाई

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime - पोलिस आल्याचे समजताच त्याने घराच्या खिडकीतून पळ काढला. आंबिवली परिसरातील जंगलात तो धावत सुटला...पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी जंगलातील चिखलात तो झोपला...मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला हेरले आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.

हा कोणत्याही चित्रपटातील सीन नाही तर आंबिवलीतील इराणी वस्तीतील चोरट्याला पकडण्यासाठी खडकपाडा व मिरा भाईंदर पोलिसांनी केलेली कामगिरी आहे. अलीहसन आबु इराणी असे चोरट्याने नाव असून त्याच्यावर मोबाईल व सोनसाखळी चोरी यांसारखे तब्बल 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मुंबईच्या मीरा भाईंदर परिसरात गेल्या आठ दिवसात सहा ते सात ठिकाणी चैन स्नॅचिंग च्या घटना घडल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असता अलीहसन या इराणी चोरट्याने ही चोरी केल्याची बाब उघडकीस आली. कल्याण आंबिवली तील इराणी वस्तीत अलीहसन राहत असून तो वस्तीतच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार मिरा भाईंदर चे पोलीस युनिट व कल्याण खडकपाडा पोलिसांचे पथक अलीहसन च्या शोधासाठी तैनात करण्यात आले. आंबिवली परिसरातील मधील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घराबाहेर सापळा रचण्यास सुरुवात केली.

या दरम्यान आरोपी अलीहसन इराणी याला पोलीस आल्याची कुणकुण लागल्याने त्याने घरातील खिडकीतून उडी मारून घराच्या काही अंतरावर असलेल्या जंगलामध्ये पळ काढला. घराच्या चारी बाजूला उभे असलेल्या पोलीसांना ते समजले.

पोलिस कर्मचाऱ्याने पथकाला याची माहिती देत त्याचा पाठलाग सुरू केला. इराणीने पोलिसांना चकवा देण्यासाठी झाडाझुडपातून धावत जंगलात असलेल्या चिखलात तो झोपला. त्यावेळी पोलिसांची चाणाक्ष नजर त्यांच्यावर गेली. पोलीस अंमलदाराने त्याला पकडण्यासाठी त्याच्या अंगावर झडप घातली. त्या दोघांमध्ये झटापट झाली.

तत्काळ खडकपाडा पोलीस ठाण्याच्या एपीआय गायकवाड व त्याच्या स्टाफने तात्काळ चिखलात धाव घेत अलीहसन ला चिखलातच पकडले. अली हसन इराणी याच्या विरोधात दिसून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली सध्या मीरा-भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मीरा-भाईंदर पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT