मुंबई

Mumbai Crime: कर्जबाजारीपणामुळे रचला अपहरणचा बनाव; इसमाला दादर येथून अटक

अपहरणाचा ढोंग: कर्जबाजारी इसमाची दादरातून अटक

सकाळ वृत्तसेवा

प्रीपेड क्रिडीट विधा लोन यांच्या कडून घेतलेल्या लोनच्या रिकव्हरीसाठी वारंवार फोन करून, घरापर्यंत येऊन, मारण्याची धमकी देत असल्याच्या भीतीच्या कर्जबाजारी पणातून स्वताच्या अपहरण आणि खंडणीचा बनाव रचणाऱ्या इसमाला दादर येथून सुखरूप ताब्यात घेण्यास आले आहे.

वसई क्राईम युनिटने ही कामगिरी केली आहे. या इसमाला आचोळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिण्यात आले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

अनुप अमृतलाल विषवकर्मा ( वय २८) असे अपहरण आणि खंडणीचा बनवा रचणाऱ्या इसमाचे नाव आहे. हा नालासोपारा पूर्व अल्कापुरी नालेश्वर मंदिरा जवळील लक्ष्मी निवास नगर येथील रहाणारा आहे.

या इसमाने प्रीपेड क्रिडीट विधा लोन यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी ९४ हजाराचे कर्ज घेतले होते. पण या कर्जाचे हाप्ते वेळेवर जात नसल्याने, अंधेरी येथील एस डब्ल्यू ओ टी कन्सलटशी चे रिकव्हरी एजंट राजेश शेट्टी हे पैसे भरण्यासाठी फोन करत होते.

जर पैसे भरले नाही तर घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनुपयाचा भाऊ अनिकेश याने १२ फेब्रुवारी रोजी आचोळा पोलीस ठाण्यात अपहरण आणि १ खंडणीची तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने वसई क्राईम युनिट ०२चे प्रभारी शाहूराज रणवरे यांच्या टीमने सर्व प्रकरणाचा सखोल तपास करून, मोबाईल लोकेशन काडून, सदर कर्जबाजारी इसमाला दादर येथून ताब्यात घेऊन तपास केला असता, अपहरण आणि खंडणीचा बनाव असल्याचे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT