Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : 'कुत्तो को ऐसे मत छोडो...', असे म्हणताच ज्येष्ठ नागरिकावर चाकूने वार

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कुत्तो को ऐसे मत छोडो, काट ने का डर रहता है...असे म्हणताच एका श्वान मालकाने ज्येष्ठ नागरिकावर चाकूने वार केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

डोंबिवली जवळील खोणी गावातील लेक शोअर पलावा वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून यामध्ये अशोक कुमार ठठू (वय 70) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात शेजाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोणी गावातील लेक शोअर पलावा सिटी मध्ये लेकसाइड सोसायटीमध्ये अशोककुमार हे राहतात. मंगळवारी सकाळी ते घराबाहेर पडले असता शेजाऱ्याने त्याचे दोन श्वान हे मोकळे सोडले होते. त्यावर अशोककुमार यांनी कुत्तो को ऐसे मत छोडो, काटने का डर रहता है, उनके गले मे पट्टा डालो असे सांगितले.

याचा राग शेजाऱ्यास आल्याने त्याने अशोक कुमार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्यांच्या हातावर वार देखील केले. तुम्हाला सोडत नाही असे म्हणून त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अशोककुमार यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात शेजाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT