suicide sakal
मुंबई

Mumbai Crime : बहीण भावाच्या नात्याला काळीमा; चुलत भावाच्या अत्याचाराला कंटाळून बहिणीची आत्महत्या

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कुर्ला पश्चिम येथे समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कुर्ला पश्चिम येथे समोर आली आहे.

मुंबई - बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कुर्ला पश्चिम येथे समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीवर तिच्या 21 वर्षीय चुलत भावाने केलेल्या अत्याचाराला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रविवारी रात्री अटक केली.

मागील अनेक महिन्यापासून आरोपी मुलीवर अत्याचार करत असल्यामुळे पिडीत मुलगी मानसिक तणावात होती. या पूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला , मात्र ती त्यावेळेस थोडक्यात वाचली. दरम्यान आरोपीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती.

तपासादरम्यान पोलिसांना पीडित मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात पीडित मुलीने 21 वर्षीय आरोपीने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहिती दिली होती. त्यावर आरोपीच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल करून गुन्ह्याची नोंद केली. आरोपीविरोधात भादंवि कलम 304,305 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत कला 8,12 ,18 गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

Spinach Corn Toast Recipe: १० मिनिटांत झटपट तयार करा स्वादिष्ट पालक-कॉर्न टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!

SCROLL FOR NEXT