मुंबई

Mumbai Crime News: घरातील कामं करत नाही म्हणून चिमुकल्याच्या गुप्तांगावर चटके; सावत्र आईचा घृणास्पद प्रकार

Latest Mumbai News | संरक्षण कायदा 2015 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा: बदलापूर घटनेनंतर चिमुकल्या मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना, वसईत सावत्र आईने एक घृणास्पद प्रकार केला आहे. घरातील कामं करीत नसल्याने दोन चिमुकल्यांना मारहाण केली. तसेच एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके देत अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

या घटनेमुळे राहत्या घरातसुद्धा चिमुकल्या मुली, मुलं सुरक्षित नसल्याचं दिसून येतंय. या प्रकरणात वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात सावत्र आईविरोधात भादंवी कलम 323, 324, 504, 506 यासह अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा नागनाथ सावसगळी असे आरोपी सावत्र आईचे नाव आहे. घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे या कारणासाठी या विकृत सावत्र आईने 7 आणि 8 वर्षांच्या मुलाला लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण केली.

यातल्या 7 वर्षांच्या मुलाच्या तर गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिले आहेत. ही घटना वडिलांना कळल्यावर सावत्र आईविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेसह आता राहत्या घरातही अल्पवयीन मुलं असुरक्षित असल्याचे वसईच्या वालीव येथील घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT