Mumbai News, Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याला केली मारहाण!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: धेरीतील डीएन नगर परिसरात एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा हॉटेलमालकाने आरोप केला आहे.

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हॉटेलमालकाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अंधेरी पश्चिमेतील डीएन नगर परिसरात केशव दत्तात्रय नाडकर्णी यांचे हॉटेल आहे. १८ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता कथित शिंदे गटाचे काही कार्यकर्ते नाडकर्णी यांच्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी जेवणाची ऑर्डर केली.

मात्र, हॉटेल बंद करण्याची वेळ असल्यामुळे आरोपी कार्यकर्त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने नकार दिला, तेव्हा कार्यकर्त्यांचा गट संतप्त झाला.

त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. नाडकर्णी यांच्या तक्रारीवरून अविनाश कांबळे, विनायक कांबळे आणि गणेश रणदिवे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास नाडकर्णी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. भेट न मिळाल्यास मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT