crime police sakal
मुंबई

Mumbai Crime : ज्वेलर्सचे दुकान फोडायला आले अन् मार खाऊन जेलमध्ये गेले! डोंबिवलीत चोरीचा प्रयत्न फसला

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सहा जणांच्या टोळक्याने चोरीच्या उद्देशाने देवश्री ज्वेलर्सचे दुकान आणि नैतिक स्टोअर्स दुकानाची मागील भिंतीला भगदाड पाडण्यास सुरुवात केली. मात्र या आवाजाने स्थानिक रहिवाशांना जाग आली. त्यांनी चोरट्यांचा चोरीचा डाव हाणून पाडत त्यातील एका चोराला पकडून बेदम मारहाण केली.

रामनगर पोलिसांना याची माहिती देत चोरटा मोहम्मद शेख (वय 19) याला पोलिसांच्या हवाली केले आहे. त्याचे इतर साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात प्रकाशसिंग यांच्या मालकीचे देवश्री ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाला लागून नैतिक स्टोअर्स दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी दुकानांची मागील भिंत स्क्रू ड्रायव्हर व कटावणीच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न सुरु केला. या आवाजाने स्थानिक रहिवाशांना जाग आली.

जागरुक नागरिकांनी लागलीच बाहेर येऊन पाहीले असता काही व्यक्ती या दुकानाची मागील भिंत फोडत असल्याचे निदर्शनास आले. या रहिवाशांनी जोराने आरडा ओरडा करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एकच चोरटा रहिवाशांच्या हातात लागला.

उर्वरीत पाच जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेल्या मोहम्मद याला रहिवाशांनी बेदम चोप दिला. त्यानंतर रामनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रामनगर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत मोहम्मद याला ताब्यात घेतले.

अटक आरोपी मोहम्मद हा मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिराजवळ मासे विक्रीचा व्यवसाय करतो. त्यातील एक चोरटा मोहम्मद रबीहुल हा आणि त्याचे साथीदार मुंबईतील मस्जिद बंदर येथून डोंबिवलीतील पेढी फोडण्यासाठी आले होते अशी माहिती प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच फरार आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT