arrested  esakal
मुंबई

Mumbai Crime : पैसे कमविण्यासाठी मुंबईत घातपाताची धमकी; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईसह पुण्यातील अनेक भागांमध्ये शनिवारी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपुर येथून अटक केली आहे. दरवेश राजभर या 22 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी त्याच्या मूळ गावी शुक्रवारी अटक केली. आरोपीची आर्थिक परिस्थिती बेताची असून झटपट पैसे कमविण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच ही कल्पना आरोपीला सोशल मीडियावरून सुचली असल्याचे तपासात समोर आले आहे.

बॉम्बस्फोटाची धमकी

आरोपीने मुंबईत घातपाताची धमकी देणारा संदेश पोलिसांना 22 जूनला गुरूवारी पाठवला होता. या संदेशात अंधेरी आणि कुर्ला भागात 24 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली. त्याने या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच पुणे शहरातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीचा संदेशही आरोपीने पाठवला. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्वरित तपास सुरू करण्यात आला.

झटपट पैसे कमविण्यासाठी धमकी

पोलिसांनी तपासात आरोपीने उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून संदेश पाठवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे मुंबई पोलीसांचे एक पथक उत्तर प्रदेशातील जौनपुरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी आरोपीला जौनपुरहून ताब्यात घेतले.

आरोपीने चौकशीत पोलिसाना आरोपीची घरची आर्थिक परिस्थीती बिकट असल्याने झटपट पैसे मिळविण्यासाठी कृत्य केल्याचे सांगितले. तसेच ही कल्पना आरोपीला सोशल मीडियावरून सुचली असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक आरोपी हा यापूर्वी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कामगार म्हणून काम करत होता. मुंबईतील न्यायालयाने आरोपी राजभरला 4 दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT