Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : अनेक वर्षांपासून सोन्याचा व्यापार करणाऱ्या सराफानेच घातला ग्राहकांना गंडा; आता...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाकुर्ली येथील महालक्ष्मी ज्वेलर्सचा मालक अचानक दुकान बंद करून गायब झाला होता. 16 गुंतवणूक दारांकडून त्याने सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्ज देतो असे सांगत त्यांची तब्बल 31 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केली होती.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात मागील वर्षी सराफ सोहनसिंह चैनसिंह दसाना (वय 52) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सराफ दसाना हा आपल्या गावी राजस्थान येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी राजस्थान येथे जाऊन दसाना याला अटक केली आहे.

ठाकुर्ली येथे दसाना यांचे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून तो सोने-चांदी दागिन्यांचा व्यापारी म्हणून व्यवसाय करत होता. परिसरातील ग्राहकांचा त्याने विश्वास संपादन करत भिशी, कर्ज यांसारख्या योजना तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून राबवित होता. जून 2108 ते जून 2022 या कालावधीत सराफ दसाना याने ठाकुर्लीत राहणाऱ्या मिनु प्रमोद गांधी (वय 53) यांच्यासह इतर 15 ग्राहकांचा विश्वास संपादन केला.

या ग्राहकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्जाऊ रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोन्याचे दागिने बनविण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. अशाप्रकारे 31 लाख 53 हजाराची रक्कम जमा झाल्यानंतर सोहनसिंह याने ग्राहकांना त्यांनी जमा केलेल्या सोन्याच्या रकमेवर कर्जाऊ रक्कम न देता, त्यांना सोन्याचे दागिने बनवून न देता दुकानाला टाळे लावून तो फरार झाला.

तो जुना व्यापारी असल्याने फसवणार नाही असा विश्वास ग्राहकांना होता. त्यामुळे त्यांनी काही दिवस दुकान सुरू होण्याची वाट पाहिली, फोनवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याची खात्री तक्रारदार मिनू यांना झाली. मिनू यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात सोहनसिंह विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, पी. के. पाटील, एल. पी. निसार, एस. पी. पिंजारी या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे पोलिसांना सोहनसिंह राजस्थान जिल्ह्यातील गटबोर तालुक्यातील थुरावड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी राजस्थान येथे सोहनसिंह राहत असलेल्या भागात तळ ठोकला. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली. या अटकेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅम कितीला? पाहा तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Live Updates Marathi : गोदावरीची पाणीपातळी घटली, तरीही पूरस्थिती कायम

Chaturmas 2026 Dos & Don'ts: आजपासून चातुर्मासाला सुरुवात; या काळात काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या नियम आणि धार्मिक महत्त्व

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

SCROLL FOR NEXT