Triple Talaq sakal
मुंबई

Triple Talaq : सोशल मीडियावर रिल बनवले म्हणून पत्नीला दिला ट्रीपल तलाख! आरोपी पतीवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील सहार पोलिसांनी सोमवारी रात्री एका व्यक्तीवर पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याच्या आरोपात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती मुतकीम सिद्दीकीची पत्नी रुखसार सिद्दिकीने सोशल मीडियावर रिल पोस्ट केल्यामुळे ट्रीपल तलाक दिल्याची माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेली रील काढली नाही तर पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा महिलेने आरोप केला आहे. याशिवाय पीडित महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. आरोपी पतीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

हुंड्याची मागणी

कुर्ला येथील वास्तव्यास असलेल्या रुखसार मुतकीम सिद्दीकीचा अंधेरी येथील रहिवासी मुतकीम सिद्दीकीशी गेल्या वर्षी 22 मार्च रोजी विवाह झाला होता. रुखसारच्या तक्रारीनुसार, मुतकीम, त्याचे आई-वडील आणि बहिणींनी हुंड्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे रुखसारचा सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुतकीमचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असून ती त्या महिलेचे त्यांच्या घरी येणे जाणे असल्याचा आरोपही रुखसारने तक्रारीत केला आहे.

रिलमुळे ट्रीपल तलाक

फेब्रुवारी 2023 मध्ये, रुखसार आजारी पडल्यानंतर तिच्या माहेरी पालकांच्या घरी गेली आणि तिथेच वास्तव्यास होती. एप्रिलमध्ये तिने एक सोशल मीडियावर एक रील पोस्ट केली होती. या रीलमुळे मुतकीमला राग आला आणि त्याने पत्नी रुखसारला फोन करून लगेच पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यास सांगितले. रुखसारने यावर नकार दिला. नकार ऐकताच संतापून मुतकिमने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रुखसारने चुनाभट्टी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती .

समेट होण्यात अपयश

26 एप्रिल रोजी रुखसार, तिची आई आणि बहीण रुखसारला तिच्या सासरी सोडण्यासाठी मुतकीमच्या घरी गेल्या असता त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर मुतकीमने तीन वेळा तलाकचा उच्चार केला आणि पत्नीला बेकायदेशीरपणे घटस्फोट दिला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी तसेच कौटुंबिक मित्रांनी हे प्रकरण मिटवण्याचा आणि समेट करण्याचा अनेक आठवडे प्रयत्न केला, पण अखेर तो निष्फळ ठरला. रुखसारने सोमवारी मुतकीम आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात ट्रिपल तलाक विरोधी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT