crime esakal
मुंबई

Mumbai Crime : पतीला दररोज थोडं-थोडं विष पाजून मारण्याचा प्रयत्न, पण...; आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी एक 53 वर्षीय महिलेविरोधात पतीला विष देऊन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पत्नीसोबत तिची बहीण आणि भावाचा सुध्दा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

या तिघा आरोपींवर पीडिताच्या बँक लॉकरमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुंबईतील एक व्यावसायिक आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार 1989 मध्ये व्यावसायिकाचे आरोपी महिलेशी लग्न झाले होते. कालांतराने 2012 पासून जोडपे त्यांच्या दोन मुली आणि एका मुलासोबत शिवडी येथे वास्तव्यास आहेत. काही वर्षांपासून जोडप्याचा आपापसात वाद सुरू आहे. तसेच व्यावसायिकाने आरोपी महिलेने त्यांच्या बँक लॉकरमधून 25 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप केला होता.

आरोपी महिलेकडून पतीला दररोज थोड थोड अन्नातून किंवा इतर स्वरूपात विष देण्यात येत होते. कालांतराने प्रकृती अस्वास्थ्यामुळे पीडीत पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान व्यावसायिकाला विष दिल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदाराने आरएके मार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली.

प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर कट रचणे, खुनाचा प्रयत्न, चोरी, गुन्हेगारी धमकी यावरून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT