CBI  esakal
मुंबई

Mumbai Crime : युनियन बँकेची कोट्यवधीची फसवणूक; के.जे. इन्फ्रा कंपनी विरोधात CBI कडून गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सीबीआयने पुण्यातील बिल्डर के.जे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. आरोपी संचलकानी युनियन बँकेची 91 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने कंपनीविरुद्ध तक्रार केल्यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये संचालक कल्याण जे जाधव, कल्याण एकनाथ काकडे, संतोष संभाजी धुमाळ आणि अमोल मारुती पेगुडे,तसेच के जे इंफ्राशी संबंधित दुसरी कंपनी विंग इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि विनोद कल्याण जाधव यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार युनियन बँकेने दिलेल्या तक्रारीत आरोपी कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांनी बँकेकडून जादा रक्कम काढण्यासाठी स्टॉक-बुक, कर्जाचे तपशील आणि बनावट नफ्याचे आकडे उत्पन्न याबाबत बनावट माहिती दिली होती. याचा फायदा घेत कंपनीने बँकेकडून क्रेडिट सुविधाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

अशाप्रकारे आरोपी कंपनीने युनियन बँकेची 91 कोटींची फसवणूक केली.या प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि परिसरात ठिकठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींच्या घरातून महत्वाची कागदपत्रे दस्तावेज, कॉम्पुटर हार्डडिस्क आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटसह आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT