mumbai crime update makeup artist theft gold of bridal two arrested by police sakal
मुंबई

Mumbai Crime : मेकअप करायला आल्या नी नवरीचे दागिने चोरुन पळाल्या

रामनगर पोलिसांनी दोघींना ठोकल्या बेड्या

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - साखरपुड्याच्या मेकअप ऑर्डरला आलेल्या ब्युटीशीयन नवरीचेच सोन्याचे दागिने चोरून लंपास झाल्याची घटना डोंबिवलीत घडली. सीसीटीव्ही मध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्याने त्यांचा भांड फुटलं आणि डोंबिवली पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. कल्पना राठोड आणि अंकिता परब असे अटक महिला आरोपीचे नाव आहे.

मुलुंड येथे राहणारी पूजा गुप्ता या 23 वर्षीय तरुणीचा 15 ऑगस्टला डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल येथील एका हॉलमध्ये सायंकाळी साखरपुडा होता. साखरपुडा कार्यक्रमासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

नवरी मुलगी पूजा हीच मेकअप करण्यासाठी कल्पना राठोड व अंकिता इंगळे उर्फ अंकिता परब या हॉल वर आल्या होत्या. पूजा हिने ऑनलाइन वरून या ब्युटीशीयन ना मेकअप ऑर्डर दिली होती. कल्पना ही मालाड येथे राहणारी असून अंकिता ही नालासोपारा येथे राहते.

साखरपुडा कार्यक्रमात सर्व मंडळी व्यस्त असताना हॉलमधील ज्या रुममध्ये नवरीचे साहित्य ठेवण्यात आले होते, त्याठिकाणी कोणी नव्हते. याच वेळी पूजा गुप्ताचा मेकअप करणारी कल्पना राठोड आणि अंकिता परब या दोघी रुममध्ये आल्या. पूजा गुप्ताची पर्स पाहून दोघींची नियत फिरली. कल्पना हिने पर्समधील दागिने काढून घेतले.

तर अंकिता हिने पर्समधील रोकड चोरली. कार्यक्रमानंतर त्या दोघी निघून गेल्या. कार्यक्रम दरम्यान नवऱ्या मुलीचे दागिनेच पर्स मध्ये नसल्याची बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. आपले दागिने हरविल्याचे पूजाच्या लक्षात येताच या प्रकरणात डोंबिवली पोलिस ठाण्यात 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, प्रशांत सरनाईक, विशाल वाघ,देविदास पोटे, आशा सुर्यूवंशी यांच्या पथकाने तपास सुरु केला.

हॉलमधील सीसीटीव्ही चेक करण्यात आला. सीसीटीव्हीत कल्पना आणि अंकिता या दोघी पूजाच्या रुममध्ये ये जा करीत असल्याचे दिसून आले. तांत्रिक तपासाच्या आधारे दावडी, सोनारपाडा परिसरातून दोघींना ताब्यात घेऊन पोलिस तपास सुरु केला.

आधी या दोघीनी उडवा उडवीची उत्तर दिले. मात्र नंतर त्यांनी कबूली दिली. दागिने पाहून नियत फिरल्याने दागिने आणि रोकड चोरी केले असे सांगितले. पोलिसांनी दोघींकडून 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Abhyanga Snan Benefits: फक्त दिवाळीतच नाही! अभ्यंगस्नान शिशिर ऋतूपर्यंत करा आणि मिळवा वर्षभराची ऊर्जा

Daund News : दिवाळी पाडव्याला नानगावात शोककळा! तुटलेल्या केबलने घेतला खळदकर दांपत्याचा बळी; करडू वाचवताना झाला अपघात

Mangalwedha News : मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण, मनोज जरांगे पाटील सहित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमंत्रित

SCROLL FOR NEXT