mumbai crime update Minor students beaten by gang of 10 people mobile dispute police  Sakal
मुंबई

Mumbai Crime : पूर्ववैमानस्यातून अल्पवयीन विद्यार्थ्यांला १० जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण

डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दावडी गावातील नारायण महाविद्यालयाच्या बाहेरच शनिवारी हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याला पूर्ववैमानस्यातून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

अल्पवयीन विद्यार्थी नारायण महाविद्यालयमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे यापूर्वी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याबरोबर मोबाईलवरून भांडण झाले होते. त्या रागातून आरोपी आणि त्याचे नऊ साथीदारांनी शनिवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर तक्रारदार विद्यार्थ्याला नारायणा महाविद्यालयाच्या बाहेर गाठले.

तेथे त्याला आरोपी निखिल यादव, किसन आणि इतर आठजणांनी जमिनीवर पाडून बेदम मारहाण केली. तक्रारदार अल्पवयीन विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी तरुण पळून गेले. अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT