Mumbai Crime update police Rescue of woman and minor girl from prostitution  Sakal
मुंबई

Mumbai Crime News : वेश्या व्यवसायातून महिलेसह अल्पवयीन मुलीची सुटका

देह विक्रीच्या दुष्ट चक्रातून महिलेसह एका मुलीची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देह विक्रीच्या दुष्ट चक्रातून महिलेसह एका मुलीची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश मिळाले आहे. या प्रकरणात वेश्या व्यवसायासाठी ढकलणाऱ्या आरोपी महिलेला देखील पोलिसांनी अटक केली आहे.राधा पटेल असे अटक महिलेच नाव असून ती गोरेगांवची रहिवासी आहे.

मुंबईतील गोरेगाव भागात एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता अल्पवयीन मुली व स्त्रीयाकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसाना मिळाली होती. त्या प्रमाणे योजना आखून पोलिसांनी पुढील कारवाईचे प्लॅनिंग केले.

5 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एम. एम. आर. डी. ए. कॉलनी, गोरेगाव पश्चिम मुंबई भागात स्थित ठिकाणी पोलीसांना बोगस ग्राहक म्हणून पाठविले. तिथे पोहोचले असता योग्य परिस्थीत हेरून ग्राहकाच्या वेशातील पोलिसांनी छापामार कारवाई केली .

या कारवाईत आरोपी महिलेला अटक करून तेथे एक महिला आणि एका मुलीची यशस्वी सुटका पोलिसांनी केली. अधिक चौकशीत आढळून आले की, आरोपी महिला अल्पवयीन मुलींना तसेच महिलाना वेश्याव्यवसायाकरीता बळजबरी करत असे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT