Mumbai Crime update racket of fake doctors health two arrested bmc health department action sakal
मुंबई

Mumbai Crime : बनावट डॉक्टरांचे रॅकेट उध्वस्त...दोघे अटकेत

कोणतीही नोंदणी किंवा वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचे भासवून गोवंडी परिसरात दवाखाना चालवल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोणतीही नोंदणी किंवा वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचे भासवून गोवंडी परिसरात दवाखाना चालवल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. पोलिसांना आरोपी डॉक्टरांबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागासह छाप्याची कारवाई करत आरोपींना अटक केली.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडूनयोजना आखण्यात आली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी एक पोलीस अधिकारी साध्या वेशात क्लिनिकमध्ये गेला. रुग्णाच्या वेशातील पोलिसाला मोहम्मद अफजल शेख हा रुग्णांवर उपचार करताना आढळला. अफझल शेखने रुग्ण म्हणून दाखवत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची तपासणी केली आणि त्या सोबत काही औषधेही लिहून दिली.

त्यानंतर अधिकार्यानी आपली ओळख सांगितली तेव्हा अफजल शेखने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अफजल हा बारावीचा पदवीधर असल्याचे कबूल केले असून तो तीन वर्षांपासून बनावट वैद्यकीय व्यवसायात गुंतला होता.

या पूर्वी डॉक्टरांसोबत कंपाउंडर म्हणून तो काम करत होता. नंतर त्याला अजून एक डॉक्टर सज्जाद शेख याने कामावर ठेवले. सज्जाद शेखला सुद्धा नंतर त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

सज्जाद शेखने दवाखान्यासाठी अनेक जागा भाड्याने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्टच्या कलमांखाली फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT