auto-rickshaw-thief-arrested esakal
मुंबई

सराईत रिक्षा चोराला दहिसरमध्ये अटक; नऊ रिक्षा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई (Mumbai-navi mumbai) परिसरातून प्रवासी रिक्षांची चोरी करणाऱ्या (Rickshaw robbery) एका सराईत चोरट्याला गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक (thief arrested) केली. मुस्लिमुद्दीन हाफीज्जूर रेहमान शेख (२७) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने विविध भागांतून चोरलेल्या तब्बल पाच लाख ६५ हजार किमतीच्या नऊ प्रवासी रिक्षा गुन्हे शाखेने (crime branch) जप्त केल्या. तो चोरलेल्या रिक्षांच्या भागांची विक्री करत असल्याचे तसेच चेसीस व इंजिनची अदलाबदल करून रिक्षा विकत असल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे (suresh mengade) यांनी दिली.

उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी रिक्षा चोरणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू होती. या वेळी गोवंडी बैंगनवाडीतील मुस्लिमुद्दीन शेख हा रिक्षांची चोरी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. याद्वारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहायक निरीक्षक राजेश गज्जल व पथकाने दहिसर मोरी भागात सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल पाच लाख ६५ हजार किमतीच्या एकूण नऊ चोरीच्या प्रवासी रिक्षा हस्तगत केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIA Cyberattack : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर मोठा सायबर हल्ला; एफबीआय अन् कृषी विभागही हॅकर्सच्या निशाण्यावर

Maharashtra Anganwadi News: अंगणवाडी सेविका-मदतनिसांसाठी मोठी बातमी! किती मिळणार प्रोत्साहन भत्ता? सरकारचे नवे नियम जाहीर

Gokul Dairy Election : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत आज सुनावणी; शासननियुक्त चार संचालकांचा मतदानाचा अधिकार योग्य की अयोग्य ठरणार

Nagpur News: गारगाई धरण, कोळसा खाण ते रेल्वे विस्तार! विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रातील ३ लाख झाडांवर कुऱ्हाड; धरणाचा वृक्षतोडीचा आकडा धक्कादायक

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

SCROLL FOR NEXT