Women molestation sakal media
मुंबई

मुंबई : विनयभंग प्रकरणात सराईत गुन्हेगाराला शिक्षा

सकाळ वृत्तेसवा

अंधेरी : महिलांशी अश्‍लील वर्तन (women molestation) करणाऱ्‍या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Culprit punishment) विनयभंगाच्या एका गुन्ह्यांत किल्ला कोर्टाने शिक्षा सुनावली. राजकुमार नारायण तांडेल (Rajkumar tandel) असे या ५६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो कुलाबा (culaba) येथील मच्छीमारनगर क्रमांक दोनचा रहिवासी आहे.

अलीकडेच त्याने एका महिलेचा विनयभंग केला होता. या गुन्ह्यांत दहा दिवसांत तपास पूर्ण करून एल. टी मार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले होते. याच गुन्ह्यांत त्याला तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांत सतरा दिवसांत आरोपीला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१८ सप्टेंबरला चर्नी रोड येथील महर्षी कर्वे रोड, स. का पाटील उद्यानाजवळ महिलांची छेडछाड होत असल्याचा संदेश प्राप्त होताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी तिथे असलेल्या एका महिलेची चौकशी केली असता तिने राजकुमार तांडेल या आरोपीने तिच्याशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार केली होती. राजकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी कफ परेड पोलिस ठाण्यात तीन तर आझाद मैदान पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT