Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : गुन्हेगाराने पत्रकारावर दगड भिरकवत केली शिवीगाळ ; व्हिडिओ व्हायरल...

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांंसमोरच केला प्रकार...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून गुन्हेगारास कारागृहात हलविण्यात येत होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर काही पत्रकार त्याचे चित्रीकरण करत असताना गुन्हेगाराने त्यांच्यावर दगड भिरकवत शिवीगाळ केली असून याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोरच हा प्रकार घडला असून यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडवाडीत राहणाऱ्या जितेंद्र उर्फ टायगर पवार याच्यावर मागील काही काळात 5 गंभीर गुन्हे दाखल झाले होते.

त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. यानंतर आज त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.

यासाठी त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून बाहेर आणून गाडीत बसवत येत असताना काही स्थानिक पत्रकार तिथे चित्रीकरण करत होते.

या पत्रकारांना पाहून जितेंद्र पवार हा संतापला आणि त्याने पत्रकाराच्या दिशेने दगड फेकून मारत शिवीगाळ केली. तसंच फक्त 1 वर्षासाठी आत मध्ये चाललो आहे, असं म्हणत पत्रकारांना धमकी देखील दिली.

त्याने भिरकावलेला दगड हा एका महिला पत्रकाराच्या पायाला चाटून गेला. धक्कादायक बाब म्हणजे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या समोरच हा प्रकार घडला. यानंतर जितेंद्र याला पोलिसांनी काहीही न बोलता गाडीत नेऊन बसवलं.

दरम्यान, जितेंद्र याला पोलीस ठाण्यातून बाहेर आणत असताना त्याच्या हातात दगड नेमका कोणी दिला? हातात दगड होता हे पोलिसांना दिसलं कसले नाही?असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. सोबतच पोलिसांनीही त्याला कोणताही अटकाव न केल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT