मुंबई

Mumbai Crime: चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणींचा वेश्याव्यवसायासाठी वापर

चित्रपट निर्मात्याला अटक; चार पीडित मुलींची सुटका

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: चित्रपट, मालिका तसेच वेब सिरीज मध्ये दुय्यम भूमिका करणाऱ्या गरीब घरातील तरुणींना फसवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी चित्रपट निर्मात्यासह त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून चार पीडित तरुणींची सुटका केली आहे.

  मुंबईतील मढ येथे राहणारा चित्रपट निर्माता सुलेमान नारकांथोल्लू हा दलाल असून तो व त्याचा  साथीदार चंद्राराज उर्फ मायकल मुत्तीपोग यांच्या संपर्कात  चित्रपट, हिंदी मालिका, वेब सिरीज मध्ये दुय्यम भूमिका करणाऱ्या तरुणी आहेत व  ग्राहकाने संपर्क साधला की या तरुणींना तो वेश्याव्यवसायासाठी  मिरा-भाईंदर, गोराई (बोरीवली) मुंबई, ठाणे, लोणावळा, दमण या परिसरातील लॉजमध्ये पाठवतो अशी माहिती मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली.

एका तरुणीसाठीचा मोबदला व त्याचे कमीशन असे एकुण ४०,००० रुपये तो ग्राहकाकडून घेत असे.

पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून   दलाल सोलोमान नारकांथोल्लू याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक रस्त्यावर तरुणी पाठवल्या.,यावेळी पोलिसांनी सोलोमन रतनामय्या नारकांथोल्लु ( ५५) व त्याचा साथीदार चंद्राराज उर्फ मायकल मुत्तीपोग (२२) यांना रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले व चार तरुणींची सुटका केली. 

याप्ररणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक  समीर अहिरराव यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT