Cyber Crime Complaint esakal
मुंबई

Mumbai Crime: फेसबूकवरच्या जाहिरातीवर क्लिक केलं अन्.. उच्चशिक्षित भावंडांना बसला सव्वा कोटींचा गंडा, काय घडलं नेमकं ?

Cyber Crime Update: चांगला नफा मिळवून देण्याची हमी या जाहिरातीत असल्याने कुतूहलापोटी त्यावर क्लिक केले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: मुंबई - अभियांत्रिकी सल्लागार आणि त्याच्या गायक बहिणीला शेअर ट्रेडिंगच्या निमित्ताने भामट्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातला. या भवडांनी अवघ्या ४५ दिवसांत इतकी रक्कम भामट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर भरली होती. या प्रकरणी जून महिन्याच्या अखेरीस सायबर पोलीस ठाण्यात(दक्षिण) गुन्हा नोंदवण्यात आला असून भामट्यांचा शोध सुरू आहे. (Latest Mumbai News)

विलेपार्ले परिसरात राहणारे कल्पेश शहा (५२) पेशाने अभियांत्रिकी सल्लागार आहेत. फोर्ट परिसरात त्यांचे कार्यालय आहे. त्यांची बहीण मनीषा गायिका आहेत. शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मार्च महिन्यात फेसबूकवर शेअर ट्रेडिंगबाबतची एक जाहिरात नजरेस पडली. चांगला नफा मिळवून देण्याची हमी या जाहिरातीत असल्याने कुतूहलापोटी त्यावर क्लिक केले.

परसपर ' व्हीआयपी ५७ ' या व्हॉट्सॲप समूहावर जोडला गेलो. या समूहाची प्रमुख आर्या शर्मा नावाच्या महिलेने ऑनलाईन फॉर्म भरून घेत स्टॉक युनियन कम्युनिटी नावाच्या आण्य व्हॉट्सॲप समूहावर घेतले. या समूहाचा प्रमुख जय सहानी नावाच्या व्यक्तीने एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे शेअर बाजारातील घडामोडी, कोणते शेअर विकत घ्यावे, कधी विकत घ्यावे याबाबत माहिती दिली जात होती. (crime update )

सुरुवातीला शहा यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. नंतर त्यांच्या बहिणीनेही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. १ एप्रिल ते १६ मे या काळात दोघांनी मिळून एक कोटी २९ लाख रुपये गुंतवले. मे महिन्याच्या अखेरीस या दोघांच्या आभासी खात्यावर १८ कोटी इतकी रक्कम जमा झाल्याचे दिसत होते. या दोघांनी ती रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही रक्कम काढण्यासाठी १५ टक्के सेवा शुल्क(दोन कोटी ७० लाख) भरावे लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा शहा यांना आपली फसवणूक सुरू असल्याची जाणीव झाली. अखेर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT