मुंबई

डबेवाल्यांची असंघटित कामगार म्हणून नोंद होणार, पात्र डबेवाले होणार सरकारी योजनांचे लाभार्थी 

मिलिंद तांबे

मुंबई, : मुंबईतील डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंद करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग खात्याकडून पत्र देण्यात आले आहे. असंघटीत कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असून त्यात पात्र डबेवाल्यांची असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करता येईल असे स्पष्ट करता येईल.

भारतीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोग येथे प्रकरण सादर करत मुंबईतील डबेवाल्यांचा असंघटीत कामगार म्हणून नोंदणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाला पत्र दिले. त्या पत्रात असंघटित कामगारांसाठी मंडळ गठीत करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

सदर मंडळात पात्र डबेवाल्यांची नोंदणी करता येणार आहे. जे डबेवाले नोंदणीस पात्र ठरतील त्यांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळेल. डबेवाल्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या योजनेचे लाभ देखील घेता येणार आहेत.

डबेवाल्यांची अंघटीत कामगार म्हणून नोंदणी झाल्यानंतर सरकारने काही आर्थिक मदतीची घोषणा केली तर त्याचा ही लाभ मिळू शकतो. डबेवाल्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. डॉ. योगेश दुबे यांनी यासाठी प्रयत्न केले असून यामुळे डबेवाल्यांना मोठा आधार मिळणार असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai dabbawala will be registered as unorganized workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला गॅरंटी दिलीय, सरकारने आणखी एक मागणी मान्य केली; मध्यरात्री CJP प्रवक्त्याने दिली माहिती

Google Maps Tips : प्रवासात पेट्रोल, टोल आणि वेळही वाचवायचा आहे? 'गूगल मॅप्स'च्या या ४ सेटिंग्स येतील कामी

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! सोनं खरेदीची सुवर्णसंधी? पाहा 24K, 22K आणि 18K चा ताजा भाव

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

SCROLL FOR NEXT