Mumbai Crime esakal
मुंबई

Mumbai Crime: बॅगेत आढळलेल्या मृतदेहाप्रकरणी मयताच्या पत्नीला अटक; तीन मूकबधिर, विवाहबाह्य संबंध अन् बेल्जियम कनेक्शन...

Dadar Station: दादर रेल्वे स्थानकात बॅगेत मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मयत अरशदअली शेख याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलीय. पत्नी रूक्सनाचा हत्येत सहभाग आढळल्याने पायधूणी पोलिसांनी ही कारवाई केली. रूक्सना हिच्या पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

संतोष कानडे

Mumbai Police: मुंबईतल्या दादर स्थानकामध्ये रविवारी रात्री कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात मोठी बॅग चढवण्याचा प्रयत्न एक तरुण करत होता. राज्य रेल्वे पोलिस दलाचे अंमलदार माधव केंद्रे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना बॅगेवर रक्ताचे डाग आढळले.

पोलिसांनी तरुणास बॅग उघडण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीच ती बॅग उघडून पाहिली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव जय चावडा असून मृत व्यक्तीचे नाव अर्शद शेख असल्याचे समजते.

दादर रेल्वे स्थानकात बॅगेत मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मयत अरशदअली शेख याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केलीय. पत्नी रूक्सनाचा हत्येत सहभाग आढळल्याने पायधूणी पोलिसांनी ही कारवाई केली. रूक्सना हिच्या पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

पायधुनी येथे जय चावडा याने अर्शद याला दारू पिण्यासाठी बोलावून मित्र शिवजीत सिंग याच्या मदतीने त्याची हत्या केली, हातोड्याने क्रूरपणे ठार मारल्यानंतर मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेसने जाण्याच्या प्रयत्नात असताना जय याला दादर रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यानंतर उल्हासनगर येथून शिवाजीत याला अटक करण्यात आली.

हत्येची घटना झाली तेव्हा बेल्जियमचा नंबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा या सगळ्यांशी काय संबंध, पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, आरोपी जय याने चौकशीत सांगितले की, जय, अर्शद आणि शिवजित सिंग हे मित्र असून तिघेही मूकबधिर आहेत. जय पायधुनी परिसरात राहतो. रविवारी तिघे त्याच्या घरी एकत्र होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर जय आणि शिवजित यांनी अर्शदच्या डोक्यात हातोडा घातला. त्यानंतर त्याच्या शरीरावर धारदार हत्यारांनी अनेक वार केले. ही हत्या पायधुनी पोलिस ठाण्यात घडली असल्याने रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सोमवारी सकाळी पायधुनी पोलिस ठाण्यात वर्ग केला. पायधुनी पोलिसांनी शिवजितला उल्हासनगर येथून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT