Dahisar crime 
मुंबई

Mumbai Dahisar: बापरे! सोसायटी मीटिंगमधील वाद, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून केला वेगळा

Mumbai Dahisar crime society meeting dispute: सोसायटीच्या अध्यक्ष सोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे अंगठा हातापासून वेगळा झाला आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai News : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथील एका सोसायटीच्या मासिक बैठकीत दरम्यान झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाला आहे. सोसायटीच्या मीटिंग दरम्यान झालेल्या वादात एका सभासदाला आपला अंगठाच गमवावा लागला आहे.

सोसायटीच्या अध्यक्ष सोबत झालेल्या बाचाबाचीत अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा चावा घेतल्यामुळे अंगठा हातापासून वेगळा झाला आहे. हा गंभीर प्रकार दहिसर पश्चिमेकडील मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंट मध्ये घडला आहे.

सोसायटीचे सदस्य असलेल्या आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यात वाद झाला. या वादात आदित्य देसाई यांचा अंगठा अध्यक्ष नित्यानंद परिवार यांनी चावून हातापासून वेगळा केला आहे. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिकच्या तपास करत आहेत.

मात्रेवाडी अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सभासदांची मीटिंग भरवण्यात आली होती. यावेळी चर्चा सुरु असतानाच सभासद आदित्य देसाई आणि अध्यक्ष नित्यानंद परिवार यांच्यामध्ये बाचाबाची सुरु झाली. वाद टोकाला गेला. नित्यानंद परिवार यांना राग अनावर झाला अन् त्यांची थेट आदित्य देसाई यांचा अंगठा चावून बाजूला केला.

अंगठा अक्षरश: बाजूला झाला होता. रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर आदित्य देसाई यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. देसाई यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT