potholes  
मुंबई

Mumbai : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची चाळण; दक्षता विभाग शोधणार खड्ड्यांची कारणे...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईतील रस्ते खड्ड्यानी व्यापले आहेत. दरवर्षी खड्ड्याच्या दुर्दशेचे दशावतार मुंबईकरांना पहायला मिळतात. मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र तरीही रस्ते पुन्हा खड्डेमय होतात कसे हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

खड्डे बुजवण्यात दिरंगाई केली जाते का, निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात येतो आहे का की अन्य काही कारणे आहेत, याचा शोध आता पालिकेचा दक्षता विभाग घेणार आहे.

पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही तक्रार कायम राहिल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यापूर्वी कोल्डमिक्स व इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मात्र कोल्डमिक्सचाही फायदा झाला नाही.

यंदा रस्त्यावर पुन्हा खड्डे पडू नयेत यासाठी पालिकेकडून 'रिअ‍ॅक्टिव्ह अस्फाल्ट' तंत्रज्ञानचा वापर करण्यात येत आहे. यात केमिकल व डांबराचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या टायरला रिअ‍ॅक्टिव्ह अस्फाल्ट चिकटत नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील १५ मिनिटांतच या रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणे शक्य होते. मात्र नवी नवीन तंत्रज्ञान वापरुनही रस्ते खड्डेमय होत असल्याचे चित्र आहे.

खड्ड़े भरण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करूनही पुन्हा रस्ते खड्डेमय होत असल्याने पालिकेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. नवे तंत्रज्ञान, कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डे कसे पडतात याचा शोध आता दक्षता विभाग घेणार आहे. हलगर्जीपणा, निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला असेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल असा इशारा दक्षता विभागाकडून करण्यात आला आहे.

खड्ड्यांच्या तक्रारींचा ओघ

पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत खड्डे पडल्याच्या १८५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी खड्डे भरण्यात आले असून ४० ते ४५ ठिकाणी कामे बाकी असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा पुन्हा खड्डे पडत असल्याने आता पालिकेकडून कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. निकृष्ट काम केल्यास दंड, काळ्या यादीत टाकणे आणि महापालिका नियमानुसार कारवाई करण्यात केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT