मुंबई

Mumbai : मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात नवीन 40 चारचाकी,184 दुचाकी समाविष्ट... गृहमंत्र्याकडून लोकार्पण

उपमुख्यमंत्र्यांसोबत पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी लोकार्पण कार्यक्रमांत सहभागी होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी निर्भया पथक वाहनांचे लोकार्पण कार्यक्रम नरिमन पॉइंटला संपन्न झाला. उपमुख्यमंत्र्यांसोबत पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी लोकार्पण कार्यक्रमांत सहभागी होते.

मुंबई पोलीस दलातील निर्भया पथकात 184 दुचाकी आणि 40 चारचाकी गाड्या सामील झाल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाला अधिक बळ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्र्यांशिवाय मंत्री दिपक केसरकर, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुजाता सौनिक,अपर मुख्य सचिव (गृह) तसेच विवेक फणसळकर यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

नवीन वाहने मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याने निर्भया पथक व बीट मार्शल अधिक सक्षम होणार आहे. मुंबई पोलीस दलातील सर्व वाहनांवर वेहिकल ट्रेकिंग सिस्टम (VTS) प्रणाली बसविण्यात आलेले आहे.

या प्रणालीमुळे सर्व वाहनांचे मुख्य व प्रादेशिक नियंत्रण कक्षातून मॉनेटरींग करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. तसेच अधिकच्या वाहनांमुळे अधिक प्रभावीपणे गस्त घालून गुन्हयांना प्रतिबंध निर्माण होण्यास मदत होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT