Pravin Darekar Sakal
मुंबई

मुंबै बँकेवर दरेकरांची पुन्हा लागणार वर्णी; उद्या होणार निवडणुका

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर दरेकरांना बँकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आता मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे. मुंबई बॅंकेतही सत्तांतर होणार असून प्रविण दरेकर यांचं मंबई बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. मविआ सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रविण दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं.

(Mumbai District Bank President Election)

दरम्यान, मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणुकही पार पडणार असून त्यामध्ये भाजपचे नेते प्रविण दरेकर यांच्या नावाची निश्चिती झाली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. याआधी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे हे या बँकेचे अध्यक्ष होते तर विठ्ठल भोसले हे उपाध्यक्ष होते. या दोघांनीही राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता.

राज्यात सत्तांतर झाल्यावर ज्या पक्षाची सत्ता त्याची मुंबई बँकेवर सत्ता असं समीकरण साधारणत: मुंबईत पहायला मिळतं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर प्रविण दरेकर यांनाही पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता त्यांची पुन्हा अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

SCROLL FOR NEXT