mumbai sakal
मुंबई

Mumbai : भाऊबंदकीत काटा काढण्याआधीच पोलिसांच्या बेड्या; गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांनी सातारा येथे जाऊन अक्षय याला अटक केली. अक्षय याने भाऊबंदकीत वाद असल्याने एकाचा काटा काढण्यासाठी परशुराम याच्याकडून पिस्तोल खरेदी केले होते. त्याने हत्येचा डाव साधण्याआधीच त्याच्या हाती मानपाडा पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील पांडुरंग वाडी येथे गावठी पिस्तोल विक्रीसाठी आलेल्या परशुराम करवले (वय 23) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्याने आणखी एक गावठी पिस्तोल सातारा येथील अक्षय जाधव याला विक्री केले असल्याचे सांगितले.

पोलिसांनी सातारा येथे जाऊन अक्षय याला अटक केली. अक्षय याने भाऊबंदकीत वाद असल्याने एकाचा काटा काढण्यासाठी परशुराम याच्याकडून पिस्तोल खरेदी केले होते. त्याने हत्येचा डाव साधण्याआधीच त्याच्या हाती मानपाडा पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंग वाडी येथील चंद्रहास हॉटेल्स परिसरात एक व्यक्ती पिस्तोल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती.

डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बागडे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, दिपक गडगे, संजू मासाळ, प्रविण किनरे, यलप्पा पाटील यांच्या पथकाची नेमणूक केली. त्यांनी सापळा रचत परशुराम याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे पोलिसांना एक गावठी पिस्तोल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने याच प्रकारे एक गावठी बनावटीचे पिस्तोल अक्षय याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी लागोलाग सातारा येथील खटाव तालुक्यातून अक्षयला ताब्यात घेतले. अक्षयकडे गावठी पिस्तोल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी परशुराम व अक्षय या दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. परशुराम याच्यावर यापूर्वीही अवैध शस्त्र विक्री व वाळु चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने अजून कोठे कोठे शस्त्र विक्री केली आहे. डोंबिवलीत तो कोणाला शस्त्र विक्री करण्यासाठी आला होता याचा तपास पोलिस करत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT