mumbai dombivli auto garage on road owner and worker beat raju chavan over encroachment sakal
मुंबई

Mumbai Crime : रस्त्यावर गॅरेज थाटल्याचा जाब विचारताच; गॅरेज चालक, कर्मचाऱ्यांचा हल्ला

गॅरेज चालकांना ते अडवीत असल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी यापूर्वी देण्यात आली होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर लेन परिसरात गाड्यांचे पार्ट विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. या गॅरेज चालकांनी रस्त्यावरील फुटपाथ तर हडपलेच आहेच. शिवाय अर्ध्या अधिक रस्त्यावर वाहने उभी करून त्यांची दुरुस्ती केली जाते. रस्त्यावर वाहने उभी करू नका, रस्ता का अडवता असा जाब सामान्य नागरिक राजू चव्हाण यांनी विचारताच त्यांना गॅरेज चालक तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली मध्ये रविवारी घडली.

यात राजू यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र तक्रार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून परप्रांतीय गॅरेज चालकांची दादागिरी समोर आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर लेन परिसरात अनेक गॅरेज, गाड्यांचे पार्ट विक्री, दुरुस्तीची दुकाने आहेत. या दुकानदारांनी दुकानासमोरील फुटपाथ आधीच अडविला असून अर्धा अधिक रस्ता देखील ते अडवितात. रस्त्यावर वाहने उभी करून त्यांची दुरुस्ती करण्याचे प्रकार येथे सुरू असतात.

डोंबिवली मधील नागरिक राजू चव्हाण यांनी अनेकदा या गॅरेज चालकांना रस्त्यावर वाहने उभी करण्यापासून मज्जाव केला आहे. सामान्य नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उरत नाही. येथे अनेक अपघात देखील होत असल्याने

याप्रकरणी ते पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे राजू यांनी सांगितले. गॅरेज चालकांना ते अडवीत असल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी यापूर्वी देण्यात आली होती.

रविवारी दुपारी ते या परिसरात गेले असता येथील साई सीट कव्हर दुकान चालकासोबत राजू यांचा याच कारणावरून वाद झाला. यानंतर गॅरेज मालक व कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने राजू यांना भर रस्त्यात मारहाण केली. राजू यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढल्याचे राजू यांनी सांगितले. राजू यांना मार लागला असून त्यांच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र तक्रार नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून प्रशासन काय कारवाई करते हे आता पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT