Mumbai sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवली - बदलापूर महामार्ग जलमय

डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील खोणी म्हाडा, धामटान, नेवाळी परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

शर्मिला वाळुंज

Mumbai - डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडचे काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण चे काम सुरू आहे. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे.

रस्त्याची काम केलं मात्र महामार्गलगत गटारांची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा फटका वाहनचालकांना पावसाळ्यात बसू लागला आहे. रस्त्यावर सखल भागात पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनांचा वेग कमी होऊन वाहन कोंडीची समस्या भेडसावत आहे.

डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील खोणी म्हाडा, धामटान, नेवाळी परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे. गेल्या दोन दिवसंपासून सुरू झालेल्या पावसाने डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्ग हा जलमय झाला आहे. महामार्गावरील ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे.

एमआयडीसीच्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावे लागत आहे. यंदा पावसाने उशिरा आगमन केलं असलं तरी एमआयडीसीचे ठेकेदार वेळेत काम पूर्ण करू शकले नाहीत. मात्र ठेकेदाराच्या या गलथान कारभाराचा वाहन चालकांना मोठा फटका बसू लागला आहे.

अर्ध्या तासाच्या पावसाने महामार्ग जलमय केल्याने अतिवृष्टीच्या कालखंडात वाहतूक कशी सुरू राहणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठेकेदारांच्या कामांवर लोकप्रतिनिधी देखील गांभीर्याने लक्ष देऊन वचक ठेवू न शकल्याने सध्या ठेकेदारांचे देखील चांगलेच फावले आहे. त्यामुळे रखडलेली गटारांची काम वेळेत पूर्ण ठेकेदार कधी करणार? की पावसाळयात वाहनचालकांना पाण्यातूनच वाट काढावी लागणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT